संजय पांडे
मो. 9823019158
..............
नागपूर ः पोलिस विभागात अनेक प्रतिभावंत, कलावंत आणि सुप्त गुणांची खान असलेले अधिकारी आहेत. मात्र, त्या सुप्तगुणांकडे कुणाची दृष्टी न पडल्यामुळे त्यांच्या गुणांवा वाव मिळाला नाही. मात्र, नागपूर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक संजय पांडे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिक असलेल्या खाकीला साहित्याचा गंध दिला आहे. संजय पांडे यांच्या काव्य-कविता, लेख, मालिका आणि साहित्याचे धनी आहेत. त्यांनी अनेक वृत्तपत्र, मासिक, पुस्तके, शासकीय प्रकाशने आणि पाक्षिकांत महिला सुरक्षा, बालकविता, प्रौंढांसाठी लेख, अध्यात्मिक लेख, तसेच शेतकऱ्यांवर लेखन करून पोलिस विभागात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना आतापर्यंत साहित्य जगताकडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच त्यांना मातोश्री प्रतिष्ठाण नागपूरतर्फे आयोजित काव्य स्पर्धेत "श्रद्धा' या विषयावर लिहिलेल्या कवितेला प्रथम पुरस्कार मिळाला, हे विशेष. तसेच पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान केल्याबद्दल 26 जानेवारी 2016 ला पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सत्कार करण्यात आला होता. संजय पांडे यांना आतापर्यंत 132 रिवार्ड आणि 24 प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
संजय भिकाजी पांडे हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील. वडील शेतकरी तर आई प्रभाताई शेतमजूर. दहावी झाल्यानंतर मिलीट्रीमध्ये जाण्याचे स्वप्न होते. मात्र, मुलाने अधिकारी व्हावे, अशी वडीलांची इच्छा. मराठवाडा विद्यापीठातून बी.एस्सी व एमबीए केले. दरम्यान बुद्धीबळ खेळाची आवड असल्याने विद्यापीठ स्तरावरील स्पर्धा गाजवली. नोकरीसाठी राज्य सेवेची तयारी सुरू. 1988 मध्ये पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण. अमरावतीमधील गाडगेबाबांचे गाव खल्लार येथे ठाणेदार असताना तेथील यात्रा गेल्या दहा वर्षांपासून बंद होती. खोलात शिरल्यानंतर दोन गटांतील वाद असल्याचे कळले. दिवाळीसारखे महत्व त्या यात्रेला होते. त्यामुळे ती यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी धडपड केली. दोन्ही गटातील म्होरक्यांना गाडगेबाबांच्या समाधीस्थळी नेऊन वाद संपुष्ठात आणला. तेव्हापासून त्या गावात आजपर्यंत गुण्यागोविंदाने निर्विघ्न यात्रा भरते. नागपूर गुन्हे शाखेत असताना पहिल्यांदा सायबर क्राईमची धुरा पांडे यांनी सांभाळली. पहिल्या तीन दिवसात 61 मोबाईल परत मिळवले होते. त्यांनी नागपूर पोलिसांना 2007 मध्ये "आयएसओ' प्रमाणपत्र मिळवून देण्यात महत्वाची भूमिका वठवली. नुकताच नागपूर पोलिसांचे "टेक एक्स्पो प्रदर्शनी'मध्ये पांडे यांच्या ट्रॅफिक विभागाच्या स्टॉलला प्रथम पुरस्कार मिळाला. तर त्यांनी आतापर्यंत 106 शाळा-कॉलेज आणि अन्य संस्थांमध्ये व्याख्याने देऊन जनजागृती केली. ते सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असून त्यांनी पोलिस मित्रांचे मोठे जाळे निर्माण केले. कर्तव्यामुळे घराकडे थोडे दुर्लक्ष झाले पण पत्नी मनिषा ही मुलांची केवळ आई नसून ती "बाप'सुद्धा असल्याचे ते अभिमानाने सांगतात. त्यांचे लवकरच "अंधारातील दीपस्तंभ' हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
अमरावतीमध्य असताना किराणासाठी आलेल्या एका वधुपित्याचे चोरट्यांनी पॉकेट मारले. लग्न तोंडावर होते, त्यामुळे तो ठाण्यात रडत होता. पांडे यांनी परिस्थिती पाहून स्वतःसह सर्व कर्मचाऱ्यां वर्गणी गोळा केली आणि त्याला किराणा घेऊन दिला. लग्नाच्या दिवशीच त्यांनी चोर पकडून त्या वधूपित्याला भेट म्हणून ते पॉकेट दिले. सध्या ते क्राईम ब्रॅंचमध्ये कार्यरत आहेत.
Mr.Anil Kamble
Crime Reporter
SAKAL,
Nagpur.
8308695600
andykamble1@gmail.com

0 comments:
Post a Comment