दीपक त-हेकर 9921584813
2007 मध्ये नागपूर पोलिस भरतीत निवड झाली. दरम्यान, त्यांनी "पोलिस प्रशासन' या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पोलिस खात्यात भरती होणारा गावातील पहिला युवक म्हणून कौतुक. वर्दी अंगावर चढल्यानंतर कर्तव्य बजावताना जीवनात अनेक चढउतार आले. आई निर्मलाबाई व पत्नी करुणाने मोलाची साथ दिल्यामुळे संकटांना तोंड देऊ शकलो, असे दीपक सांगतात. कारागृहातून पॅरोल किंवा फर्लोवर बाहेर आलेले कैदी पुन्हा कारागृहात परतत नाहीत. त्यांना पकडण्याची जबाबदारी दीपक यांच्यावर आहे. मतदारयादीपासून ते टॉवर लोकेशनपर्यंत किचकट तपासात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी आतापर्यंत फरार झालेल्या 11 सराईत कैद्यांना पकडले आहे.
शेख सर्फराज या कुख्यात चेनस्नॅचरने परिसरात हैदोस घातला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्याला मोठ्या चातुर्याने अटक केली होती. यामध्ये दीपक यांची भूमिका महत्त्वाची होती. नंदनवनमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचा माल भरलेला ट्रक दोन आरोपी बाहेर राज्यात घेऊन जात होते. त्यांनी क्लीनरचे हातपाय बांधून बुटीबोरीजवळ फेकून दिले. वर्धा रोडने ट्रक जात असताना ट्रकमालक पोलिस ठाण्यात आला. ट्रकला जीपीआरएस सिस्टम असल्याचे सांगताच दीपक यांनी ट्रकचा पाठलाग करणे सुरू केले. सायबर क्राईमच्या मदतीने आर्वी शहराकडे जात असलेल्या ट्रकचा पाठलाग केला. आर्वी पोलिसांना नाकाबंदीच्या सूचना केल्या. तर काही तासांत त्या ट्रकचोरांना अटक केली. सध्या ते नंदनवन ठाण्यात कार्यरत आहेत.
नंदनवन पोलिस ठाण्याअंतर्गत महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला व मृतदेह घरातील जमिनीत पाच फूट खोल खड्ड्यात पुरला. याचा छडा लावण्यासाठी नंदनवन पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर गेले. कुजलेला मृतदेह काढण्यासाठी रोजंदारीने आणलेल्या चौघांनी नकार दिल्याने पोलिसांची पंचाईत झाली. दुर्गंधीमुळे घरात उभे राहणे कठीण झाले होते. अशा स्थितीत पोलिस शिपायी दीपक वामन तऱ्हेकर यांनी खोल खड्ड्यातून मृतदेह काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी मृतदेह पोलिस वाहनात टाकून मेडिकलमध्ये नेला. या मर्डर डिटेक्शनमध्ये पोलिस आयुक्तांनी त्यांना रिवार्ड दिला. कॉम्प्युटरचे सखोल ज्ञान असल्यामुळे पोलिस विभागातील टेक्नोसॅव्ही कर्मचारी म्हणून दीपक यांची ओळख आहे.दीपक तऱ्हेकर हे मूळचे भंडारा जिल्ह्यातील राजणी खेडेगावातील. संरक्षण सेवेत जाण्याची इच्छा असल्याने त्यांनी दहावीपासूनच तयारी केली. शेतीची कामे करताना अभ्यास व मैदानावर प्रॅक्टिस सुरू ठेवली. बारावीनंतर पहिल्याच प्रयत्नात मिलिटरीमध्ये निवड झाली. मात्र, प्रशिक्षणाला जाताना प्रवासादरम्यान प्रकृती बिघडल्याने संधी हुकली. त्यामुळे व्हेटरनरी सायन्सच्या शिक्षणाकडे वळले. डॉक्टर झाल्यानंतर गावात काही काळ नि:शुल्क सेवा केली. पशूचे डॉक्टर म्हणून गावात नाव झाले. मात्र, संरक्षण सेवेत जाण्याचे स्वप्न अपूर्ण होते. त्यामुळे पुन्हा जोमाने तयारी सुरू केली.